डोंबिवली येथील जाणता राजा युवा प्रतिष्ठानने दिवाळीनिमित्त किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या !
ठाणे, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – आजच्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या किल्ल्यांचा इतिहास समजावा, या उद्देशाने डोंबिवली येथील मोठागाव भागातील जाणता राजा युवा प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळीनिमित्त विशाळगड आणि पन्हाळगड या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. मोठया प्रमाणात नागरिकांनी येथे भेट देऊन ‘अशा उपक्रमांची समाजाला आवश्यकता आहे’, असे मत व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम यांनी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले. या वेळी प्रतिष्ठानच्या वतीने श्री. कदम यांना तुळशीचे रोप भेट म्हणून देण्यात आले.