‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील पार्टीचे निमंत्रण मिळाले होते ! – पालकमंत्री अस्लम शेख

पालकमंत्री अस्लम शेख

मुंबई – ‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील पार्टीचे मलाही निमंत्रण मिळाले होते, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. काशिफ खान या व्यक्तीने हे निमंत्रण दिले होत; पण मी त्याला ओळखत नाही, तसेच मी या पार्टीला गेलोही नाही, असे शेख यांनी स्पष्ट केले.‘महाराष्ट्र सरकारला पाडण्याचे आणि अपकीर्त करण्याचे प्रयत्न चालू आहेत. गुजरातमध्ये २० सहस्र कोटींपेक्षा अधिक रकमेचे अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले; पण त्याची चर्चा न होता आर्यन खान प्रकरणाचाच गाजावाजा झाला आहे’, असेही ते म्हणाले.