कु. ॲलिस स्वेरदा यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याशी मराठीत बोलता येण्यासाठी मराठी शिकण्याची इच्छा असणे
‘मला साधकांशी मराठीत बोलायचे असल्याने मराठी शिकायची होती. वास्तविक मराठी भाषा शिकण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या माझ्या आध्यात्मिक आई आहेत आणि मला अन्य साधकांचे साहाय्य न घेता त्यांच्याशी संवाद साधायचा असतो.
२. मराठी भाषेचे लक्षात आलेले महत्त्व
अ. ‘मराठी भाषा ही अर्थपूर्ण भाषा आहे.
आ. मराठी भाषेतील शब्दांत जी स्पंदने आहेत, ती स्पंदने त्या शब्दाचा अर्थ सांगणार्या विषयाशी जुळतात’, असे मला जाणवले.
इ. मराठी भाषा म्हणजे सत् आहे. ‘सत्’ (सत्य) हा ईश्वराचा एक गुण आहे.
ई. मराठी भाषा सुंदर असून तिच्यात माधुर्य आहे.
उ. मराठी भाषा ऐकतांना मन आनंदाने एकदम भरून जाते.
३. मराठी आणि इंग्रजी या भाषांत जाणवलेला भेद
अ. मराठी भाषेत जसा भाव जाणवतो, तसा भाव इंग्रजी भाषेत जाणवत नाही.
आ. इंग्रजी भाषा आध्यात्मिकदृष्ट्या कोरडी आहे; कारण इंग्रजी भाषेला कोणताच आध्यात्मिक पाया नाही. ‘गुरुमाऊली’, ‘भाव’ यांसारख्या मराठी शब्दांना इंग्रजीत शब्दच नाहीत.
४. मराठी भाषेत चैतन्य असल्याने ‘इंग्रजीच्या तुलनेत माझे मराठीतील हस्ताक्षर चांगले आहे’, असे माझ्या लक्षात आले.
५. मराठी भाषेत लिहिण्याचा सराव करतांना आध्यात्मिक उपाय होत असल्याचे जाणवणे
मी जेव्हा प्रथमच मराठी भाषेत लिहिण्याचा सराव करण्यास आरंभ केला होता, तेव्हा माझ्यावर आध्यात्मिक उपाय होत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे जेव्हा मला आध्यात्मिक त्रास होतो, तेव्हा तो त्रास न्यून होण्यासाठी मी मराठी शब्द लिहिण्याचा प्रयत्न करते. (विदेशी असूनही कु. ॲलिस यांना मराठी भाषेचे महत्त्व कळते आणि मराठी पालक मात्र पाश्चात्यांचे अंधानुकरण करून पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देतात ! – संपादक)
मला मराठी भाषेप्रमाणेच तेजस्वी आणि आनंद देणारे अध्यात्मशास्त्र शिकवल्याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. ॲलिस स्वेरदा, इंग्लंड (२५.९.२०२१)
मराठी भाषा शिकण्यासाठी मराठी शब्दांचा अर्थ दर्शवणारी चित्रे काढणेमराठी भाषा शिकतांना मला बरेच प्रयत्न लागत होते. त्यामुळे मराठी भाषा शिकण्यासाठी मी विविध मार्ग शोधले; परंतु त्यांतून मला काहीच साध्य झाले नाही. त्यानंतर मी ‘फ्लॅशकार्ड ॲप’च्या (भ्रमणभाषमधील प्रणालीच्या) साहाय्याने मराठी शब्दांशी संबधित चित्र काढू लागले. अशी १०० चित्रे काढली. त्यामुळे मला ते शब्द स्मरणात ठेवणे सोपे झाले. – कु. ॲलिस स्वेरदा |
|