फसवणुकीची दीड लाख रुपयांची रक्कम परत मिळाली !
सायबर पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार प्रविष्ट केल्याचा परिणाम !
संभाजीनगर – ‘होम लोन’वर ‘टॉप अप लोन’ घेताच केवायसी (स्वतःची सर्व माहिती देणे) अपडेट करण्याचे आमीष दाखवून मुख्याध्यापक राजेंद्र कहाटे यांची जवळपास दीड लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली; मात्र कहाटे यांनी तात्काळ शहरातील सायबर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केल्यानंतर केवळ अर्ध्या घंट्यांत त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले.