अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या संपत्तीविषयी मोहित कंबोज यांच्याकडून प्रश्नचिन्ह !

भंगारवाला करोडपती कसा झाला ? हे जनतेला कळायला हवे !

डावीकडून मोहित कंबोज आणि नवाब मलिक

मुंबई – नवाब मलिक यांच्याकडे ३ सहस्र कोटी रुपयांची अनामत संपत्ती आहे. त्यांच्या एकूण २२ मालमत्ता आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब ‘फॅमिली ट्रस्ट’च्या नावाने जोडले गेले आहे. भंगारवाला करोडपती कसा झाला ? हे राज्यातील जनतेला कळायला हवे, असे आवाहन करत मोहित कंबोज यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषद घेऊन अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या संपत्तीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या वेळी मोहित कंबोज म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचा धुळे येथील कार्यकर्ता सुनील पाटील हा आर्यन खान प्रकरणाचा सूत्रधार आहे. किरण गोसावी हा सुनील पाटील याचा सहकारी आहे. ‘माझ्या माणसाची अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकार्‍याशी चर्चा करून द्या’, असे पाटील याने सॅम डिसूझा याला सांगितले होते. मागील २० वर्षांपासून सुनील पाटील याचा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध असून तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जिवलग मित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी सुनील पाटील यांचे घरगुती संबंध आहेत.’’