तुमची मेहुणी अमली पदार्थाच्या व्यवसायात गुंतलेली आहे का ?
नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांना ‘ट्वीट’द्वारे प्रश्न !
मुंबई – समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर अमली पदार्थाच्या व्यवसायात गुंतलेली आहे का ? तिचा खटला पुणे न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या, असे ‘ट्वीट’ अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी केले आहे. या ‘ट्वीट’ समवेत मलिक यांनी या खटल्याचा दिनांक, नोंदणी क्रमांक आदी तपशील दिला आहे. याचे स्पष्टीकरण समीर वानखेडे यांनी द्यावे, असे आवाहन मलिक यांनी प्रसिद्धीमाध्यमांद्वारे केले आहे.