(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेमध्ये काश्मीरच्या लोकांना समर्थन देत राहू !’ – ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामी कोऑपरेशन (ओ.आय.सी.)
पाकिस्तानच्या दबावातून अशा प्रकारचे विधान करून ‘ओ.आय.सी.’ केवळ पाकला खुश करण्यापलीकडे काहीही साध्य करू शकत नाही; कारण काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे कुणी कितीही बाता मारल्या, तरी त्यात पालट होऊ शकणार नाही, हे ‘ओ.आय.सी.’सारख्या संघटनांनी लक्षात ठेवावे ! – संपादक
नवी देहली – ओ.आय.सी. (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामी कोऑपरेशन) संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेमध्ये काश्मीरच्या लोकांना आत्मनिर्णय घेण्याच्या अधिकाराचे समर्थन कायम ठेवणार आहे, असे विधान या संघटनेचे विशेष दूत युसेफ अॅल्डोबे यांनी पाकच्या दौर्यावर केले. त्यांनी पाकव्याप्त काश्मीरचा दौराही केला. युसेफ अॅल्डोबे पुढे म्हणाले, ‘‘ओ.आय.सी.च्या पुढील बैठकीमध्ये काश्मीरच्या स्थितीविषयी अहवाल बनवून तो सादर करण्यात येईल.’’ अॅल्डोबे यांनी पाकमध्ये ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फ्रेंसच्या प्रतिनिधींशी काश्मीरविषयी चर्चा केली.