चित्रपटगृहाचे मालक अंसल बंधूंना ७ वर्षांची शिक्षा
देहलीतील ‘उपहार’ चित्रपटगृहातील आगीचे प्रकरण
नवी देहली – येथील ‘उपहार’ चित्रपटगृहाला १३ जून १९९७ मध्ये लागलेल्या आगीच्या प्रकरणी पटियाला हाऊस न्यायालयाने चित्रपटगृहाचे मालक सुनील अंसल आणि गोपल अंसल यांना पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून प्रत्येकी ७ वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच २ कोटी २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. या आगीमध्ये ५९ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० हून अधिक जण घायाळ झाले होते. या वेळी या चित्रपटगृहात ‘बॉर्डर’ चित्रपट दाखवला जात होता. येथील ‘ट्रान्सफार्मर’ला आग लागल्याने ही घटना घडली होती, तसेच येथे आगीपासून संरक्षण करण्याची कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचे चौकशीतून समोर आले होते.