फ्रान्समध्ये पुन्हा जिहादी आतंकवाद्याकडून पोलिसांवर चाकूद्वारे आक्रमण !
|
|
कांस (फ्रान्स) – येथे महंमद पैगंबर यांचे नाव घेत आणि अल्ला हू अकबरच्या घोषणा देत एका आतंकवाद्याने पोलिसांवर चाकूद्वारे आक्रमण केले. या आक्रमणात ३ पोलीस घायाळ झाले. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आक्रमणकर्ता आतंकवादी घायाळ झाला. या आतंकवाद्याची अद्याप ओळख पटलेली नसली, तरी तो अल्जेरियातील रहाणारा असून तो ३७ वर्षांचा असल्याचे सांगण्यात आले. फ्रान्समध्ये यापूर्वी, म्हणजे २३ एप्रिलमधील एका घटनेत अशा प्रकारच्या झालेल्या आक्रमणात एका पोलिसाचा यात मृत्यू झाला होता. पोलिसांनी नंतर त्याला गोळ्या मारून ठार केले होते.
A French police officer was wounded early on Monday morning after a man claiming to act “in the name of the prophet” stabbed him in the southern city of Cannes, police sources told AFP. https://t.co/m8XrFOZwVK
— The Local France (@TheLocalFrance) November 8, 2021