इतरांचा विचार करणार्‍या आणि गुरुदेवांप्रती भाव असणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या आधुनिक वैद्या (सौ.) वृंदा चौधरी (वय ५५ वर्षे) !

आधुनिक वैद्या (सौ.) वृंदा चौधरी

१. प्रेमभाव 

‘सौ. वृंदाकाकूंकडे रुग्णाईत साधक गेल्यावर त्यांना साधकांसाठी ‘काय करू आणि किती करू ?’ असे होते.’ रुग्णालयातील कर्मचारी आणि परिचारिका यांना त्यांचा आधार वाटतो.

२. ‘सौ. वृंदाकाकूंमध्ये नम्रता आणि शिस्त आहे. त्या सगळ्यांशी नम्रतेने बोलतात.

– (पू.) कु. दीपाली मतकर

३. इतरांचा विचार करणे

अ. ‘साधक उपचारासाठी रुग्णालयात आल्यावर त्यांचा वेळ वाया जाऊ नये’, यासाठी काकू त्यांच्या साहाय्यक आधुनिक वैद्यांना साधकांच्या समवेत पाठवतात.

आ. त्या ‘साधक आणि समाजातील रुग्ण यांना अल्प खर्चात कसे बरे करता येईल ?’, यासाठी प्रयत्नरत असतात.

इ. ‘रुग्णांना नैसर्गिक उपचारांनी बरे वाटण्यासाठी त्या प्रयत्नरत असतात, उदा. वेदना न्यून होण्यासाठी त्या रुग्णांना दीर्घ श्वसन करायला सांगतात.

ई. एकदा शस्त्रकर्माच्या वेळी काकूंची साहाय्यक आधुनिक वैद्या उशिरा आली. तेव्हा काकू त्यांना म्हणाल्या, ‘‘आता शस्त्रकर्म करायला उशीर होईल. रुग्णाच्या दृष्टीने शस्त्रकर्म वेळेत करणे आवश्यक होते. तुम्ही आधी येऊन सिद्धता करायला हवी होती.’’

३. स्थिर

काकू प्रत्येक कृती स्थिर आणि शांत राहून करतात. रुग्ण कितीही अत्यवस्थ असला, तरी काकू स्थिर राहून त्याच्या उपचारांचे नियोजन करतात.

४. धर्माचरणी

त्या कुंकू लावून रुग्णालयात जातात. तेव्हा त्या ‘रुग्णालयातील अन्य कर्मचारी काय म्हणतील ?’, असा विचार करत नाहीत.

५. सेवाभाव

त्या संक्रांत आणि दिवाळी या सणांच्या वेळी रुग्णालयातील कर्मचार्‍यांना सात्त्विक उत्पादनांच्या भेटसंचाचे वितरण करतात. त्या वेगवेगळे लघुग्रंथ प्रायोजित करून भाविक रुग्णांना भेट देतात. त्यांच्या घरी दैनिक ‘सनातन प्रभात’ येते. काकू रुग्णालयातील हिंदुत्वनिष्ठ विचारांच्या परिचारिका आणि कर्मचारी यांना दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला देतात.’

– सौ. राजश्री तिवारी

६. भाव

अ. ‘काकू सतत देवाच्या अनुसंधानात असतात. गुरुदेवांचे नाव घेतले, तरी त्यांची भावजागृती होते.’ – (पू.) कु. दीपाली मतकर

आ. ‘एकदा त्यांचे यजमान रुग्णालयात असतांना मी त्यांना भ्रमणभाष केला. तेव्हा त्यांनी ‘गुरुदेवांचे लक्ष आहे’, या भावाने कृतज्ञता व्यक्त केली. ‘गुरुदेव यजमानांना धोक्याच्या स्थितीतून बाहेर काढणार आहेत’, असा त्यांचा भाव होता.

इ. ‘प्रत्येक रुग्णाला तपासतांना आणि शस्त्रकर्म करतांना समवेत गुरुदेव आहेत’, असा त्यांचा भाव असतो.’

– सौ. राजश्री तिवारी, सोलापूर (२९.१.२०२०)