साधिकेच्या मनातील ओळखून तिला प्रश्न विचारून अंतर्मुख करणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !
‘१४.३.२०२० या दिवशी रात्री १० ते १२ या वेळेत मी ध्यानमंदिरात नामजप करण्यासाठी बसले होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आले, ‘सद्गुरु राजेंद्रदादा (सद्गुरु राजेंद्र शिंदे) माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. मी प्रत्येक प्रसंगात सकारात्मक रहाण्याचा प्रयत्न करते आणि तसे सारणीत लिहिते. ‘कोणत्या प्रसंगात काय प्रयत्न केले ?’, ते मी आढाव्यात वाचून दाखवते. मला श्रीरामामुळेच हे शक्य होते. सद्गुरु राजेंद्रदादांनी मला ‘तुम्हाला हे कसे जमते ?’, असा प्रश्न विचारल्यावर मी त्यांना ‘मला श्रीरामामुळेच जमते’, असे सांगीन.’
१५.३.२०२० या दिवशी संध्याकाळी ५.१५ ते ६.४५ या कालावधीत आमचा व्यष्टी साधनेचा आढावा होता. तेव्हा मी सद्गुरु राजेंद्रदादांनी सांगितलेला गृहपाठ लिहून घेतला आणि त्यांना प्रसंगात केलेल्या प्रयत्नांविषयी सांगितले. त्या वेळी सद्गुरु राजेंद्रदादा मला म्हणाले, ‘‘तुम्हाला एवढे कसे जमते ?’’ तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘श्रीरामामुळे.’’ तेव्हा ‘माझ्या मनात आलेला विचार त्यांना समजला, म्हणजे ते साधकाच्या मनातील जाणून प्रश्न विचारतात’, हे माझ्या लक्षात आले. ‘सद्गुरु राजेंद्रदादांनी माझ्या मनात उत्पन्न झालेला प्रश्न लगेच माझ्या मनातून काढून टाकला आणि मला अंतर्मुख केले’, असे मला जाणवले.’
– कु. महानंदा पाटील (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.४.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |