अनिल देशमुख यांची रवानगी पुन्हा अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत
मुंबई – सत्र न्यायालयाचा निर्णय रहित करत मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची रवानगी पुन्हा अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत केली आहे. त्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात १ नोव्हेंबर या दिवशी देशमुख यांना अटक करण्यात आली होती. ६ नोव्हेंबरपर्यंत देशमुख अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत होते; मात्र त्यानंतरच्या सुनावणीत सत्र न्यायालयाने देशमुख यांच्या बाजूने निर्णय देत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला अंमलबजावणी संचालनालयाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या सुनावणीमध्ये न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाच्या बाजूने निर्णय दिला.