पुणे येथे मौजमजेसाठी दुचाकी गाड्या चोरणार्या टोळीला अटक !
मौजमजेसाठी दुचाकी चोरणार्यांवर संस्कारही नाहीत आणि कायद्याचा धाकही नाही, हे गंभीर आहे.
पुणे – मौजमजेसाठी दुचाकी गाड्या चोरणार्या तिघांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी नुकतीच सापळा रचून अटक केली. युनूस मुल्ला, हनुमंत वाकडे, दीपक कटकधोंड अशी तिघांची नावे असून त्यांच्याकडून ५ लाख रुपयांच्या १३ दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विधाते यांनी दिली. या तिघांसमवेत विधिसंघर्षित बालकालाही (बाल न्याय (काळजी आणि संरक्षण) अधिनियम २००० मध्ये गुन्हेगारी कृत्ये केलेली बालके) कह्यात घेतले आहे. या टोळीकडून हडपसरमधील ७, फरासखाना आणि स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी १ असे एकूण ९ गुन्हे उघडकीस आले असून, उर्वरित ३ वाहनांच्या मालकांचा शोध चालू आहे.