वाळवा (जिल्हा सांगली) येथे हिंदु धर्माभिमान्यांचे देवतांची चित्रे असलेले फटाके विक्री होऊ नयेत यांसाठी जागृती अभियान !
देवतांची चित्रे असलेले फटाके विक्री न होण्यासाठी प्रयत्नशील धर्माभिमानी इतरांसाठी आदर्शच ! – संपादक
वाळवा (जिल्हा सांगली), ७ नोव्हेंबर (वार्ता.) – वाळवा (जिल्हा सांगली) येथे हिंदु धर्माभिमान्यांनी देवतांची चित्रे असलेले फटाके विक्री होऊ नये, यांसाठी जागृती अभियान राबवले. या अभियानाच्या अंतर्गत आष्टा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. फटाके विक्रेत्यांना, तसेच गावात जागृती करणार्या पत्रकांचे वाटप करण्यात आले. याचसमवेत जागृतीसाठी हुतात्मा चौक येथे फलकही लावण्यात आला होता. या अभियानामुळे हिंदूंमध्ये जागृती होऊन सकारात्मक परिणाम दिसून आला.
या अभियानासाठी अधिवक्ता योगेश कुलकर्णी, डॉ. विनायक कोरे, सर्वश्री श्रीकांत ख्याडगी, वैभव शिंदे, सतीश चव्हाण, वैभव लोहार, सचिन नायकवडी, मोहन सुतार, अतुल अहीर, अनिल झेंडे, कृष्णात झेंडे, सचिन नायकवडी, सचिन भगरे, दीपक खोत आदी धर्माभिमान्यांनी विशेष परीश्रम घेतले. हे अभियान राबवण्यात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी धर्माभिमान्यांना दिशादर्शन केले. (देवतांची चित्रे असलेले फटाके विक्री होऊ नयेत, यांसाठी संघटितपणे प्रयत्न करणार्या वाळवा येथील हिंदु धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! इतरत्रच्या हिंदूंनी हा आदर्श घेऊन हिंदु धर्मजागृतीच्या कार्यात पुढाकार घ्यावा ! – संपादक)