फटाक्यांची अवैध विक्री रोखण्यासाठी विविध ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदने

भिवंडी – येथील धर्मप्रेमी श्री. देवराज राका आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भिवंडीचे नायब तहसीलदार आणि आयुक्त यांना फटाक्यांची अवैध विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याविषयी निवेदन दिले.

निवेदन स्वीकारतांना भिवंडीचे निवासी नायब तहसीलदार गोरक्ष फडतरे

मुंबई – येथील जोगेश्वरी पोलीस ठाणे आणि अंधेरी पोलीस ठाणे येथे धर्मप्रेमी श्री. सुरज ठाकूर आणि श्री. सुनील मांगले यांनी निवेदन दिले.

नेरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय चव्हाण निवेदन स्वीकारतांना

नवी मुंबई – नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि नेरूळ पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले. या वेळी भाजपच्या युवा मोर्च्याचे जिल्हा महामंत्री श्री. गुलाबकुमार, श्री. ॠषभ अंचन, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश सनिल उपस्थित होते.