विसाव्या शतकात मराठीवर आलेले उर्दूचे संकट
‘कोकणी मुसलमानांची एक मोठी शिक्षण परिषद रत्नागिरीस झाली. त्या परिषदेचे अध्यक्ष एक मोठे शासकीय अधिकारी होते. त्या मुसलमान अधिकार्याच्या आणि इतर वक्त्यांच्या भाषणांत असे स्पष्ट सांगण्यात आले, ‘कोकणी मुसलमानांस जी आपली धर्मभाषा नाही, ती आपल्या घरादारांतून बोलण्याची लाज वाटावयास पाहिजे ! ही लज्जास्पद स्थिती टाळण्यासाठी शेकडो रुपयांचा निधी उभारून ठिकठिकाणी उर्दू शाळा भराभर वाढत असून त्यांना शिक्षक पुरवण्यासाठी शिक्षक-शाळाही निघाल्या आहेत. त्यांस शासकीय कोषातून अनेक शिष्यवृत्त्या सढळ हाताने मिळतात.’ (आजही असेच होत आहे. – संकलक)
‘उत्तरेची मुसलमानी भाषाच राष्ट्रभाषा करण्याची ही दुराग्रही लाट महाराष्ट्रातही सर्वत्र पसरून सहस्रो मुसलमान उर्दूला डोक्यावर घेऊन आपल्या खर्या मातृभाषेच्या छातीवर नाचण्यास कमी करणार नाहीत ! जर वेळीच आपण तिच्या दारावर कडक पहारा ठेवला नाही, तर उर्दू शब्दांचा धुडगुस सुरू होऊन मराठीलाही सिंधी-पंजाबीप्रमाणे स्वत्वहीन होऊन जावे लागेल ! ‘नाही’ म्हणणार्यांनी ध्यानात धरावे की, सिंधी-पंजाबी वाङ्मयेही एका काळी मराठीप्रमाणेच शुद्ध होती आणि ज्या मुसलमानी चळवळीने आणि हिंदूंच्या भाबड्या ‘चालू दे रे’, म्हणणार्या ढिलाईने त्या भाषा स्वत्व गमावून बसल्या तीच मुसलमानी चळवळ महाराष्ट्रात चालू झाल्याविना रहात नाही.’
– स्वा. सावरकर