त्रिपुरामध्ये बांगलादेशी पशूतस्कराचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू
आगरतळा (त्रिपुरा) – त्रिपुरा राज्यातील सिपहिजाला जिल्ह्याच्या कमलानगर गावामध्ये जमावाने एका संशयित पशूतस्कराला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. हा पशूतस्कर बांगलादेशात रहाणारा होता, असे सांगितले जात आहे. सिपहिजाला हा जिल्हा बांगलादेशच्या
सीमेला लागून आहे.
५ नोव्हेंबरच्या रात्री ३ पशूतस्करांनी सीमा ओलांडून बांगलादेशातून भारतात घुसखोरी केली. (इतक्या सहज घुसखोरी करता येणे, हा अंतर्गत सुरक्षेसमोरही मोठा धोका आहे. सरकारने यावर तात्काळ उपाययोजना काढायला हवी ! – संपादक) हे तिघे जण येथील लिटन पॉलच्या घराबाहेरील गाय चोरी करत होते. या वेळी लोकांना जाग आल्यावर त्यांनी या तस्करांना पकडण्याचा प्रयत्न केला. तिघांपैकी दोघे पळून गेले, तर एकाला लोकांनी पकडून मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याच्याकडून बांगलादेशी चलन आणि भ्रमणभाष संच हस्तगत केला आहे.