बिशप जोसेफ कल्लारंगट यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाचा आदेश
पाला बिशप मार जोसेफ कल्लारंगट यांनी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्काेटिक जिहाद’ यांविरोधात वक्तव्य केल्याचे प्रकरण
|
कोची (केरळ) – ‘नार्काेटिक जिहाद’ विषयी वक्तव्य केल्यामुळे केरळच्या एका न्यायालयाने पाला बिशप मार जोसेफ कल्लारंगट यांच्या विरोधात १५३ (अ) कलमासह अन्य कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. बिशपच्या विरोधात ‘इमाम काऊन्सिल ऑफ इंडिया’ने एक याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला. या प्रकरणी केरळच्या कुराविलांगड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
Narcotic Jihad remark: Kerala court orders cops to file case against Pala bishop Joseph Kallarangatt https://t.co/SivmTbpWVd
— TOI Kochi (@TOIKochiNews) November 2, 2021
सप्टेंबर २०२१ मध्ये कोट्टयमच्या एका चर्चच्या समारंभाला संबोधित करतांना जोसेफ कल्लारंगट यांनी, ‘केरळमध्ये ख्रिस्ती मुली ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्काेटिक जिहाद’ यांच्या बळी पडत आहेत. केरळमध्ये ‘लव्ह जिहाद’ असल्याचे नाकारणे, म्हणजे वास्तवापासून तोंड फिरवण्यासारखे आहे. राज्यात मुसलमान विचारसरणी बलपूर्वक लादण्याचे षड्यंत्र चालू आहे. सर्व कॅथॉलिक समाजाला याची माहिती असायला पाहिजे’, असे म्हटले होते. यावर केरळचे मुख्यमंत्री विजयन् यांनीही अप्रसन्नता दर्शवली होती. ‘समाजात धर्माच्या आधारावर विभाजन करणारे वक्तव्य करता कामा नये’, असे विजयन् म्हणाले होते.
CM Vijayan asks Pala bishop to rectify remark https://t.co/6ELAcDgEnt
— Asia Post (@AsiaPost3) September 23, 2021
तथापि ‘नार्काेटिक जिहाद’च्या वक्तव्यानंतर बिशप कल्लारंगट यांनी केरळमध्ये वाढती कट्टरता आणि धर्मांधता यांविषयीही चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, ‘खोटी धर्मनिरपेक्षता भारताला नष्ट करेल. त्यामुळे खर्या धर्मनिरपेक्षतेचे रक्षण करणे आवश्यक आहे.’