रामनाथी आश्रमातील कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले असतांना एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू. (सौ.) योया सिरियाक वाले यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण
रामनाथी आश्रमातील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर (वय ६६ वर्षे) यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले असतांना एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू. (सौ.) योया सिरियाक वाले यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण
१. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्राची सत्यता आणि स्पंदने१ अ. ‘सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्राची सत्यता : ८० टक्के १ आ. सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील चांगली स्पंदने : ६० टक्के’ – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले |
२. ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण
२ अ. लिंगदेह
२ अ १. कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचा लिंगदेह अनाहतचक्रातून आज्ञाचक्रात जाणे : सूक्ष्मातील पुढील प्रवासासाठी काकूंचा लिंगदेह सप्तलोकातील एक एक लोक पार करत वर गेला.
२ आ. भाव
२ आ १. भावाचे वलय लिंगदेहाभोवती असणे
२ इ. आनंद
२ इ १. आनंदाचे वलय कै. (सौ.) काकूंच्या मुखाभोवती कार्यरत होणे : कै. (सौ.) काकूंमध्ये भाव असून त्या ईश्वराच्या अखंड अनुसंधात असल्याने असे झाले.
२ ई. चैतन्य
२ ई १. चैतन्याचे वलय कै. (सौ.) काकूंच्या देहाभोवती कार्यरत होऊन ते वातावरणात प्रक्षेपित होणे : काकूंमध्ये भाव असून त्यांची आध्यात्मिक पातळी चांगली असल्याने असे झाले.
२ उ. शक्ती
२ उ १. शक्तीचे वलय कै. (सौ.) काकूंच्या देहाभोवती कार्यरत होणे : ‘काकूंचे वाईट शक्तींच्या आक्रमणापासून रक्षण व्हावे’, तसेच ‘त्यांच्या लिंगदेहाच्या पुढील प्रवासातील अडथळे दूर व्हावेत’, यांसाठी असे झाले.
३. सौ. केसरकरकाकू यांची त्यांच्या मृत्यूपूर्वी जाणवलेली वैशिष्ट्ये
अ. केसरकरकाकू ईश्वराच्या अखंड अनुसंधानात असून त्यांचा नामजप आतून आपोआप चालू असल्याचे जाणवले. त्यांची साधना अंतर्मनातून होत असल्यामुळे त्या नेहमी आनंदी असत.
आ. परात्पर गुरुदेवांनी ‘सौ. केसरकर लवकरच देहत्याग करतील’, हे आधीच जाणल्यामुळे ते काकूंशी बोलत. त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी काकूंना मार्गदर्शन केले. ‘सौ. काकूंना मृत्यूनंतर महर्लाेकात स्थान मिळण्यात कोणतेही अडथळे येऊ नयेत’, यासाठी परात्पर गुरुदेवांनी त्यांना अधिकाधिक चैतन्य दिले.’
४. मृत्यूनंतर कै. (सौ.) केसरकरकाकू यांच्याविषयी जाणवलेली वैशिष्ट्ये
अ. केसरकरकाकू यांच्यात भाव असल्याने देवतांच्या साहाय्याने त्यांचा लिंगदेह आज्ञाचक्रातून शांतपणे बाहेर आला.
(‘कै. सौ. केसरकरकाकूंचा लिंगदेह त्यांना असणार्या संतांच्या आशीर्वादामुळे सहस्रारचक्रातून बाहेर पडला आहे.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले)
आ. मृत्यूनंतर काकूंचा लिंगदेह परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे आला आणि त्यांनी परात्पर गुरुदेवांकडून मार्गदर्शन घेतले. त्यानंतर साधनेच्या पुढील प्रवासासाठी काकूंचा लिंगदेह महर्लाेकात आनंदाने गेला.
इ. त्यांच्या मुखावर भाव, स्थिरता आणि साक्षीभाव जाणवत होता.
ई. वातावरणात त्रासदायक स्पंदने न जाणवता काकूंकडून शांती प्रक्षेपित होत होती.
उ. साधक-पुरोहित मंत्रपठण (टीप १) करत असतांना ‘काकूंना ईश्वराकडून आशीर्वाद मिळाले. त्या वेळी त्यांचे सर्व प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास, तसेच पुढील साधनाप्रवासातील अडथळे ईश्वराने दूर केले’, असे मला जाणवले.
(टीप १ : कै. (सौ.) काकूंच्या निधनानंतर दुसर्या दिवशी त्यांच्या देहावर अग्नीसंस्कार होणार होते. शास्त्रानुसार पार्थिव अग्नीत अर्पण करण्यापूर्वी त्याची शुद्धी होण्यासाठी मंत्रपूर्वक प्रोक्षण केले जाते. यातून देहाला पुढची गती प्राप्त होते.)
५. कै. (सौ.) केसरकरकाकूंच्या पुनर्जन्माविषयी मिळालेले ज्ञान
अ. काकूंमध्ये साधक आणि संत यांच्याप्रती पुष्कळ सेवाभाव अन् आदर होता. काकूंना कशाचीही आसक्ती नव्हती, तसेच त्यांच्यात त्यागी वृत्ती, स्थिरता, साक्षीभाव आणि ईश्वराप्रती पुष्कळ भाव होता. त्यामुळे त्यांना महर्लाेकात स्थान मिळेल. तेथे त्या लवकरच संत होऊन जनलोकात स्थान मिळवतील.
आ. समष्टी कार्यात साहाय्य करण्यासाठी काकूंचा ‘ईश्वरी राज्या’त पुन्हा जन्म होईल. त्या जन्मात त्यांना देहप्रारब्ध नसेल. ‘केवळ साधना करणे’, हेच त्यांचे ध्येय असेल. त्या जन्मात काकूंची वृत्ती सात्त्विक असेल, तसेच त्या नेहमी आनंदात असतील.
६. साधक किंवा संत यांच्या आध्यात्मिक पातळीनुसार मृत्यूनंतर त्यांचा लिंगदेह बाहेर पडण्याचा मार्ग
– एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के) (हे लिखाण संत होण्यापूर्वीचे असल्याने त्यांच्या नावात पालट केलेला नाही. – संकलक) (१९.१०.२०२१)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |