हिंदु नाव धारण करून भाड्याने रहाणार्या धर्मांधाकडून महिलेवर बलात्कार आणि तिचे धर्मांतर !
|
|
देहली – हिंदु नाव धारण करून एका हिंदु महिलेच्या घरात भाड्याने रहाणार्या धर्मांधाने त्याच महिलेवर बलात्कार करून तिचे धर्मांतर केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.
१. दानिश नावाचा धर्मांध ‘दिनेश’ हे हिंदु नाव धारण करून पीडितेच्या घरी भाड्याने रहायला आला.
२. एकदा त्याने पीडित हिंदु महिलेची ती स्नान करतांनाची अश्लील चित्रफीत बनवली. ही चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने पीडितेवर अनेक वेळा बलात्कार केला.
३. एवढेच नव्हे, तर त्याने पीडितेचे बलपूर्वक धर्मांतर केले, तसेच तिला बलपूर्वक गोमांस खाण्यासही भाग पाडले. त्याने पीडितेचे एकूण साडेआठ लाख रुपयेही हडप केले.
४. कालांतराने दिनेश हा हिंदु नसून तो मुसलमान असल्याचे, तसेच तो विवाहित असून त्याला २ मुले असल्याचेही पीडित हिंदु महिलेला समजले.
५. आरोपीच्या सहकार्यांनीही पीडितेशी छेडछाड केली.
६. या प्रकरणी आरोपी दानिश आणि त्याचे सहकारी यांच्या विरोधात २९ ऑक्टोबर या दिवशी बुराडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिनेश राणा उपाख्य इनाम अली उपाख्य दानिश राणा आणि त्याचे सहकारी यांच्या विरोधात बलात्कार, मारहाण, गुन्हेगारी षड्यंत्र, फसवणूक आदी कलमांच्या अंतर्गत गुन्हे नोंदवले.
७. आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी पीडित हिंदु महिलेला संरक्षण दिले आहे.