वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !
‘हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा आणि त्यांच्यावर आतंकवादाचा शिक्का मारण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे हे हिंदूंच्या विरोधातील एक षड्यंत्रच आहे. विविध नियतकालिके, सामाजिक माध्यमे, दूरचित्रवाहिन्या आदी व्यासपिठांवरून हिंदूंची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. याविषयी हिंदूंनी जागृत राहून अशा प्रकारे केल्या जाणार्या वैचारिक आतंकवादाला तेजस्वी विचारांनी प्रत्युत्तर दिले पाहिजे.’
१. वैचारिक आतंकवादाची उदाहरणे
१ अ. हिंदु राष्ट्राची मागणी : जेव्हा आम्ही हिंदु राष्ट्राची मागणी करतो, तेव्हा विरोधक म्हणतात की, ही मागणी घटनाविरोधी आहे; कारण राज्यघटनेमध्ये ‘आपण ‘सेक्युलर’ (निधर्मी) आहोत’, असे म्हटले आहे. तेव्हा ते जाणीवपूर्वक हे लपवतात की, हा ‘सेक्युलर’ शब्दच मूळ राज्यघटनेत नव्हता, तर तो तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या वेळी घुसडवला आहे. ‘जर आणीबाणी हे लोकशाहीवरील आक्रमण होते’, असे मानले जाते, तर तो ‘सेक्युलर’ शब्द आम्हाला बंधनकारक का असावा ? मग ते म्हणतात, ‘आपले राज्य कायद्याचे आहे आणि राज्यघटना ही कायद्याचे मूळ आहे.’
(क्रमश: पुढच्या रविवारी)
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद (मे २०२१)