चीन बांगलादेशला भंगारातील शस्त्रे विकत आहे ! – तस्लिमा नसरीन यांचा दावा
चीनने आतापर्यंत ज्या देशांना शस्त्रे, कोरोनाविषयी उपकरणे आदी विकले ते निकृष्ट दर्जाचेच निघाल्याचे उघड झाले आहे. चीन विश्वासघातकी आहे, हे आता जगाला कळू लागले आहे ! – संपादक
नवी देहली – बांगलादेशने चीनकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी अब्जावधी डॉलर्स व्यय केले. आता चीनने दिलेली शस्त्रे बांगलादेशचे तज्ञ तपासत आहेत. ते सांगत आहेत, ‘ही शस्त्रे काहीच काम करत नाहीत.’ ही शस्त्रे चीनच्या भंगारातून पाठवली जात आहेत, असा दावा बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्वीट करून केला आहे.
Bangladesh spent billions of dollars to buy arms from China. Now Bangladesh’s arms experts check that nothing works. All are sent from Chinese junkyards.
— taslima nasreen (@taslimanasreen) November 6, 2021