कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील ‘ॐ निर्विचार’ हा नामजप ऐकतांना ‘एस्.एस्.आर्.एफ्’च्या विदेशी साधिकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजातील ‘ॐ निर्विचार’ हा नामजप ऐकतांना ‘एस्.एस्.आर्.एफ्’च्या विदेशी साधिकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती
५ ते ११.७.२०२१ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ‘ॐ निर्विचार’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला. त्यानंतर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले साधक, आध्यात्मिक त्रास असलेले ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक, आध्यात्मिक त्रास नसलेले साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेले ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक, असे एकूण १८ साधक अन् संत यांना ७ दिवस प्रतिदिन १० मिनिटे ऐकवण्यात आला. त्या वेळी या प्रयोगात उपस्थित असलेल्या काही साधिकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करण्याचे महत्त्व !‘मन जोपर्यंत कार्यरत आहे, तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, भावजागृती इत्यादी कितीही प्रयत्न केले, तरी मन कार्यरत असते, तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला, तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतात. याउलट ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो. त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास साहाय्य होते.’ संत आणि साधक यांना मिळालेले सूक्ष्म ज्ञान आणि साधकांनाआलेल्या अनुभूती यांतील साम्य !‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप केल्यावर काय अनुभूती येतात, याची माहिती सद्गुरु गाडगीळ आणि सूक्ष्म ज्ञान प्राप्तकर्त्या कु. मधुरा भोसले यांनी सांगितली आहे. त्यात सांगितल्याप्रमाणे चांगल्या अनुभूती बहुतेक साधकांना आल्या आहेत, हे पुढील लिखाणावरून लक्षात येईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेला आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती
एक साधिका
६.७.२०२१ या दिवशी आलेली त्रासदायक अनुभूती
‘प्रयोगाच्या वेळी मला पुष्कळ थकल्याप्रमाणे आणि शक्तीहीन वाटत होते. तसेच मला झोपावेसे वाटत होते.
७.७.२०२१ या दिवशी आलेल्या चांगल्या अनुभूती
१. प्रयोगाच्या वेळी नामजप ऐकतांना माझी भावजागृती होऊन मला परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता वाटत होती.
२. माझी वृत्ती अंतर्मुख होऊन माझ्या मनात ‘मला स्वतःत पालट करायला हवा, तसेच माझी साधना वाढण्यासाठी मी आणखी कोणते प्रयत्न करायला हवेत ?’, असे सकारात्मक विचार माझ्या मनात येत होते.’
२. आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या साधिकेला आलेल्या त्रासदायक अन् चांगल्या अनुभूती
एक साधिका (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के)
५.७.२०२१ या दिवशी आलेली त्रासदायक अनुभूती
‘मला काहीसे अस्वस्थ वाटत होते आणि मी नामजप ऐकू शकत नव्हते.
आलेली चांगली अनुभूती
आज प्रयोगाच्या वेळी मला अधिक काही जाणवत नव्हते; मात्र ‘या नामजपातून माझ्यावर नामजपादी उपाय होत आहेत’, असे मला जाणवले; कारण नामजप ऐकवण्याचे थांबवल्यावर मला पुष्कळ ढेकरा येत होत्या.’
३. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकेला आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती
सौ. देवयानी होर्वात, युनायटेड किंगडम् (ब्रिटन)
५.७.२०२१ या दिवशी आलेली त्रासदायक अनुभूती
‘ध्वनीमुद्रित केलेला ‘ॐ निर्विचार’ हा नामजप लावल्यानंतर आरंभी माझ्या मनात अनेक विचार येत होते आणि मला एकाग्रता साध्य करता येत नव्हती. अंदाजे ५ मिनिटांनंतर मी नामजपावर लक्ष केंद्रित करू शकले.
आलेल्या चांगल्या अनुभूती
१. मला माझ्या विशुद्धचक्राच्या स्थानी संवेदना जाणवत होत्या.
२. प्रयोग संपल्यानंतर मला पुष्कळ जांभया येत होत्या. त्यामुळे ‘या नामजपामुळे माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाले’, असे मला जाणवले.
३. मला आतून स्थिर आणि शांत वाटत होते.
४. प्रयोगानंतर बराच वेळ माझे मन शांत होते. माझी अंतर्मुखता वाढली होती. प्रयोगाच्या आधी काही दिवस माझ्या मनात साधकांविषयी पुष्कळ प्रतिक्रिया येत होत्या; परंतु प्रयोगानंतर माझ्या मनातील प्रतिक्रिया न्यून झाल्या. मला साधकांतील केवळ गुण दिसत होते आणि त्यांच्याप्रती प्रेमभाव वाटत होता.
८.७.२०२१ या दिवशी आलेल्या चांगल्या अनुभूती
१. ध्वनीमुद्रित केलेला ‘ॐ निर्विचार’ हा नामजप मी एकाग्रतेने ऐकत होते. ‘मी या नामजपात अगदी आत आत खोलवर जात आहे’, असे मला जाणवत होते. मी नामजपाशी एकरूप होऊन ध्यानावस्थेत गेले होते. जेव्हा नामजप ऐकवणे थांबवण्यात आले, तेव्हा माझे नामजपाशी असलेले अनुसंधान थांबले.
२. नामजप ऐकवणे थांबवण्यात आले, तरीही माझे डोळे बंदच होते. या स्थितीत मला माझ्याभोवती तेजस्वी प्रकाश जाणवत होता. त्या वेळी मला आतून पुष्कळ शांत आणि ध्यानावस्थेत गेल्याप्रमाणे वाटत होते.
९.७.२०२१ या दिवशी आलेल्या त्रासदायक अनुभूती
१. जेव्हा नामजप लावण्यात आला, तेव्हा मला अस्वस्थ वाटत होते.
२. प्रयोगानंतर मला थकल्याप्रमाणे वाटत होते.
आलेल्या चांगल्या अनुभूती
१. नामजप ऐकतांना मला शांत आणि आनंदी वाटत होते.
२. नामजप ऐकतांना ‘मला झोप लागली कि मी ध्यानावस्थेत गेले ?’, हे मला नेमकेपणाने कळले नाही; परंतु ‘नामजप चालू आहे’, याची मला जाणीवच नव्हती. जेव्हा नामजप ऐकवणे साधकाने थांबवले, तेव्हा मी याच स्थितीत होते. या स्थितीत मला चांगले वाटत होते. साधकांनी मला जागे केले. तेव्हा मला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या शिथिल वाटत होते; परंतु त्याच वेळी मला झोपही येत होती.
३. आज प्रयोगाच्या वेळी मला जाणवले, ‘चांगल्या आणि वाईट शक्ती यांमध्ये सूक्ष्मातून युद्ध होत आहे. त्यामुळे शरिरातून शक्ती खेचली जात आहे, तसेच नामजपाने माझे संरक्षण होत आहे.’
११.७.२०२१ या दिवशी आलेल्या त्रासदायक अनुभूती
१. ध्वनीमुद्रित केलेला ‘ॐ निर्विचार’ हा नामजप ऐकतांना केवळ काही वेळच मी नामजपावर लक्ष केंद्रित करू शकले.
२. नंतर मला झोप लागली. ‘मला नेमकी झोप लागली होती कि मी ध्यानावस्थेत होते ?’, हे मला कळले नाही; परंतु नामजप ऐकल्यानंतर मला पुष्कळ थकवा जाणवत होता.’
‘निर्विचार’ आणि ‘ॐ निर्विचार’ हे नामजप ऐकतांना साधिकांना जाणवलेली तुलनात्मक सूत्रे१. आध्यात्मिक त्रास असलेली एक साधिका अ. ‘निर्विचार’ या जपाच्या तुलनेत ‘ॐ निर्विचार’ हा नामजप अधिक सगुण स्तरावरील आहे. ‘निर्विचार’ या जपाच्या तुलनेत ‘ॐ निर्विचार’ या नामजपामुळे माझ्यावर नामजपांचा उपायात्मक परिणाम अल्प जाणवला. आ. ‘ॐ निर्विचार’ या नामजपाने माझ्यावर फारसा परिणाम झाला नाही, म्हणजे माझ्या मनातील विचारांचे प्रमाण न्यून न होता ते बराच वेळ टिकून होते. इ. ‘निर्विचार’ हा नामजप ऐकल्यानंतर माझी जी स्थिती होती, त्या तुलनेत ‘ॐ निर्विचार’ हा नामजप ऐकल्यानंतर माझी स्थिती फारशी चांगली नव्हती.’ (११.७.२०२१) २. आध्यात्मिक त्रास असलेली आणि ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेली एक साधिका अ. ‘मला हा नामजप ऐकायला चांगले वाटत होते; परंतु ‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना जेवढी शक्ती जाणवत होती, तेवढी शक्ती ‘ॐ निर्विचार’ हा नामजप ऐकतांना जाणवत नव्हती. आ. ‘ॐ निर्विचार’ या नामजपाच्या तुलनेत ‘निर्विचार’ या नामजपात अधिक शक्ती जाणवली. याचे कारण ‘ॐ निर्विचार’ हा नामजप सगुण स्तरावरील असून ‘निर्विचार’ हा नामजप निर्गुण स्तरावरील आणि अधिक सूक्ष्म आहे.’ (५.७.२०२१) ३. आध्यात्मिक त्रास नसलेली साधिका सौ. देवयानी होर्वात, युनायटेड किंगडम् : ‘निर्विचार’ या नामजपाच्या तुलनेत ‘ॐ निर्विचार’ या नामजपात मृदूता असून या नामजपामुळे अधिक शांत आणि हलकेपणा जाणवला.’ (९.७.२०२१) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |