भारत-पाक सीमेवर ३ वर्षांनी दिवाळीनिमित्त दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांना दिली मिठाई !
पुलवामा येथील आक्रमणानंतर बंद झाली होतील परंपरा !
|
नवी देहली – भारत-पाकिस्तान सीमेवर ३ वर्षांनंतर दिवाळीनिमित्त दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांना मिठाई दिली. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आदी सीमांवर मिठाई वाटण्यात आली. यापूर्वी प्रतिवर्षी ही परंपरा होत होती; परंतु काश्मीरमधील पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणानंतर ही परंपरा खंडित झाली होती.
Diwali 2021: BSF exchange sweets with Pakistan Rangers at Attari-Wagah border https://t.co/DOBhDg3HEY
— Republic (@republic) November 4, 2021
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्याला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेवर भारताचे सीमा सुरक्षा दलाचे सैनिक आणि पाकिस्तानी सैनिक यांनी एकमेकांना मिठाई दिली. पंजाबच्या अमृतसर येथील प्रसिद्ध अटारी-वाघा सीमेवर भारत आणि पाक सैनिकांनी एकमेकांना मिठाई भरवली. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील सीमेवरही सैनिकांकडून अशाच प्रकारे मिठाई वाटण्यात आली.