५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बदलापूर (जिल्हा ठाणे) येथील कु. संस्कृती नीलेश कांबळे (वय ९ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. संस्कृती नीलेश कांबळे ही एक आहे !
(‘वर्ष २०२० मध्ये कु. संस्कृती हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)
कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया (६.११.२०२१) या दिवशी कु. संस्कृती नीलेश कांबळे हिचा नववा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. संस्कृती नीलेश कांबळे हिला नवव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. जन्मापूर्वी
‘गर्भारपणात मला देवाच्या कृपेने गुरुपौर्णिमेच्या प्रसाराची सेवा करता आली.
२. जन्माच्या वेळी
नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे डोळे मिटलेले असतात; परंतु संस्कृती जन्माला आल्यावर तिचे डोळे उघडे होते. ती सर्वांकडे पहात होती.
३. जन्म ते १ मास
संस्कृती १ मासाची असतांना श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून हुंकार द्यायची आणि एकटीच हसत रहायची. तेव्हा ‘ती आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये संवाद चालू आहे’, असे मला वाटायचे.
४. वय १ ते २ वर्षे
अ. ती पनवेलला तिच्या आजी-आजोबांच्या समवेत बाहेर गेल्यावर मंदिर किंवा भगवा झेंडा दिसला की, नमस्कार करत असे, तसेच ती दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ला नमस्कार करत असे.
आ. तिची गणपतिस्तोत्र आणि मारुतिस्तोत्र पाठ आहेत. ती सकाळी उठल्यावर ही स्तोत्रे म्हणते.
इ. तिचा स्वभाव शांत आणि प्रेमळ आहे. त्यामुळे ती सर्वांना आवडते.
ई. संस्कृती तिच्या आजी-आजोबांच्या समवेत साप्ताहिक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्यास जात असे.
५. वय ३ ते ५ वर्षे
५ अ. प्रतिदिन कुंकू लावून शाळेत जाणे : संस्कृती प्रतिदिन सकाळी शाळेत जातांना देवाला नमस्कार करते. ती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असूनही प्रतिदिन कुंकू लावून शाळेत जाते. तिच्या मैत्रिणी कपाळाला कुंकू किंवा टिकली लावत नाहीत. त्या तिला विचारतात, ‘‘तू कुंकू का लावतेस ?’’ तेव्हा ती त्यांना सांगते, ‘‘मी हिंदू आहे. कुंकू लावल्यावर कृष्णबाप्पा माझ्या समवेत असतो; म्हणून मी कुंकू लावते.’’
६. वय ६ ते ८ वर्षे
अ. संस्कृती मला नेहमी विचारते, ‘‘आई, आपण गुरुदेवांकडे कधी जायचे आहे ?’’ तेव्हा मी तिला सांगते, ‘‘आपण पुष्कळ सेवा केल्यावर परात्पर गुरु डॉक्टर आपल्याला बोलावतील. तेव्हा आपण जाऊ.’’
आ. तिचे बाबा साधना करत नाहीत. मी तिला साधनेचे जे काही दृष्टीकोन सांगते, ते सर्व ती तिच्या बाबांना सांगते.
इ. ती सर्वांशी मिळूनमिसळून वागते. ती मोठ्या माणसांचे ऐकते आणि त्यांचा आदर करते.
ई. ती बालसंस्कारवर्ग ऐकते.
७. स्वभावदोष
दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाणे, भ्रमणभाषचा अधिक वापर करणे, उशिरा उठणे, राग येणे, हट्टीपणा आणि आळशीपणा.
‘परात्पर गुरु डॉक्टर, हे लिखाण माझ्याकडून लिहून घेतल्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. नेहल नीलेश कांबळे (आई), बदलापूर, ठाणे. (१९.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |