गुरूंचे शिष्याला मायेतून मुक्तीचे आशीर्वचन ।
भाऊ-बहीण नाते आहे लौकिक ।
गुरु-शिष्य नाते आहे अलौकिक ।। १ ।।
भाऊ-बहिणींमध्ये असे प्रेम सीमित ।
गुरु शिष्यांमध्ये असे प्रेम असीमित ।। २ ।।
बहिणींच्या मनी असे भावाचा उत्कर्ष ।
गुरूंच्या मनी असे शिष्याचा परमोत्कर्ष (टीप १) ।। ३ ।।
इंद्राणीने पातिव्रत्याच्या बळाने केले इंद्राचे रक्षण ।
गुरुकृपेने होत असते शिष्याचे सदैव आत्मरक्षण ।। ४ ।।
बहीण-भावाचे असे मायेचे बंधन ।
गुरूंचे शिष्याला मायेतून मुक्तीचे आशीर्वचन ।। ५ ।।
टीप १ – आध्यात्मिक उन्नती
– श्री. प्रणव मणेरीकर, देहली (२२.८.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |