परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उत्कट भाव असणारी आणि स्वकौतुकाकडे साक्षीभावाने पहाणारी कु. सान्वी धवस !
एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू.(सौ.) योया वाले यांनी कु. सान्वी हिच्याविषयी काढलेले कौतुकोद्गार !
१. संतांनी सांगितलेली सूत्रे लिहून घेतांना सान्वीचा भाव जागृत होऊन ‘तो वातावरणात प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे आणि सान्वीच्या भावामुळे स्वतःचीही भावजागृती होणे
‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या सर्व साधकांना एका संतांचा सत्संग लाभला. या सत्संगाला मी आणि कु. सान्वी धवस उपस्थित होतो. सत्संग चालू असतांना सान्वीने स्वतःच्या शंका विचारून त्यांचे निरसन करून घेतले. ती संतांच्या मार्गदर्शनातील सूत्रेही लिहून घेत होती. ही सूत्रे लिहितांना तिचा भाव जागृत होऊन तिच्या डोळ्यांतून भावाश्रू वहात होते. सत्संगात मी सान्वीच्या मागेच बसले होते. त्यामुळे मला तिचा तोंडवळा दिसत नव्हता; मात्र ‘तिच्यात असलेला उत्कट भाव वातावरणात प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. तिच्यातील भावामुळे माझीही भावजागृती झाली.
ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी जन्माला आलेल्या या दैवी बालकांकडून पुष्कळ गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
२. साधक गुणवैशिष्ट्ये लिहित आणि सांगत असतांना त्याकडे साक्षीभावाने पहाणारी सान्वी !
एका सत्संगाच्या वेळी एका साधकाने उपस्थित सर्व साधकांना सान्वीची गुणवैशिष्ट्ये लिहिण्यास सांगितली. त्या वेळी सान्वी तेथेच बसली होती. मी तिचे निरीक्षण करत होते. तेव्हा ‘हा प्रसंग ती साक्षीभावाने पहात आहे’, असे मला जाणवले. नंतर साधक तिची गुणवैशिष्ट्ये सांगत असतांना ती सहज स्थितीत होती.
३. स्थिरपणे परिस्थिती हाताळणे
सान्वी पुष्कळ समंजस आणि जिज्ञासू वृत्तीची आहे. ‘ती भावनाशील न होता स्थिरपणे परिस्थिती हाताळते’, असे विविध प्रसंगांतून माझ्या लक्षात आले. कोणतेही सूत्र ती भावनाशील न होता स्वीकारते आणि शिकून पुढे जाते. सांगितलेली प्रत्येक कृती ती भावपूर्णरित्या करते.
४. महर्लाेकातील जिवाप्रमाणे सान्वीची स्थिती असून तिच्याकडून चैतन्य प्रवाहित होते.
५. सान्वीमध्ये स्पर्धात्मक वृत्ती नसल्याने तिला स्पर्धेत हरल्याचे दुःख न होणे
मागील वर्षी झालेल्या कराटेच्या एका शालेय स्पर्धेत कु. राधा गडोया (वय १० वर्षे) ही बालसाधिका जिंकली आणि सान्वी हरली. या वेळी ‘सान्वीला राधा जिंकल्याचा आनंद झाला’, असे मला जाणवले. सान्वीमध्ये स्पर्धात्मक वृत्ती आणि तिच्या समवेत येणारा अहं नाही. तिच्यामध्ये इतरांचा विचार करणे आणि इतरांना साहाय्य करणे, हे गुण आहेत.
दैवी बालके धर्माने वागणारी आणि सात्त्विक आचरण करणारी असल्यामुळे त्यांच्याकडून पुष्कळ गोष्टी शिकण्यासारख्या असतात. मला शिकण्याची संधी दिल्याबद्दल मी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करते. (१५.१०.२०२०)
श्री गुरुचरणी समर्पित !’
– (पू.) सौ. योया वाले, एस्.एस्.आर्.एफ्., युरोप