बांबोळी येथील मानसोपचार संस्थेत उपचारार्थ भरती केलेला गुन्हेगार पळाला
गुन्हेगारांना ओळखू न शकणारे पोलीस !
पणजी – बांबोळी येथील मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्थेत उपचारार्थ भरती करण्यात आलेला शहाबुद्दीन शेख (वय २३ वर्षे) हा गुन्हेगार शौचालयात जाण्याचे निमित्त करून पोलिसांच्या तावडीतून पळाला, अशी माहिती आगशी पोलिसांनी दिली. (हा गुन्हेगार एवढा हुशार आहे, हे ओळखता न येणारे पोलीस ! पोलिसांनाच चकवा देणार्या एवढ्या हुशार गुन्हेगाराला कोणत्या आधारे मानसोपचार संस्थेत भरती केले होते ? – संपादक) शहाबुद्दीन शेख याला वास्को आणि सभोवतालच्या परिसरात वाहनांची चोरी केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. नंतर त्याची कोलवाळ कारागृहात रवानगी करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्याला उपचारासाठी मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्थेत भरती केले होते. (असे पोलीस आतंकवाद्यांना कधी ओळखू शकतील का ? – संपादक)