परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे नाक आणि तोंड यांतून उच्छ्वासावाटे बाहेर सोडलेली हवा गरम असण्यामागील कारणे !
‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना नाक आणि तोंड यांतून उच्छ्वासावाटे बाहेर सोडलेली हवा त्यांच्यासमोर १ – २ सें. मी. अंतरावर अनुक्रमे बोट आणि हाताचा तळवा धरल्यास गरम असल्याचे जाणवते. तसेच नाकावाटे दीर्घ उच्छ्वास सोडल्यास नाकाखालील त्वचेला नकोशी वाटणारी गरमी जाणवते. यामागील कारण येथे दिले आहे.
१. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या नाक आणि तोंड यांतून उच्छ्वासावाटे बाहेर सोडलेली हवा गरम असण्यामागील कारणे
१ अ. देहामध्ये चालू असलेल्या सूक्ष्म युद्धामुळे देहाचे तापमान वाढणे आणि उच्छ्वासावाटे वातावरणात गरम हवा प्रक्षेपित होणे : ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले वातावरणाची शुद्धी करण्यासाठी वातावरणातील त्रासदायक शक्ती श्वासावाटे स्वत:च्या देहामध्ये खेचून घेतात. श्वासावाटे त्यांच्या देहात आलेली त्रासदायक शक्ती त्यांच्या देहातील चैतन्यामुळे नष्ट होते. परात्पर गुरु डॉक्टर आठवले त्यांच्या देहातील सात्त्विकता, दैवी शक्ती आणि चैतन्य उच्छ्वासावाटे वातावरणात प्रक्षेपित करतात. ही प्रक्रिया चालू असतांना त्यांच्या देहामध्ये आकृष्ट झालेली त्रासदायक शक्ती आणि कार्यरत असणारे चैतन्य यांच्यात सूक्ष्म युद्ध होते. त्यामुळे त्यांच्या देहाचे तापमान वाढते आणि त्यांच्या उच्छ्वासावाटे वातावरणात गरम हवा प्रक्षेपित होते.
१ आ. सूर्यनाडी अधिक वेळ चालू असणे आणि सूर्याप्रमाणे पुष्कळ दैवी ऊर्जा प्रगट होऊन कार्यरत होऊन श्वासावाटे गरम हवा प्रक्षेपित होणे : वाईट शक्तींशी सूक्ष्मातून युद्ध करतांना परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांची सूर्यनाडी अधिक वेळ चालू असते. त्यामुळे त्यांच्या देहामध्ये सूर्याप्रमाणे पुष्कळ दैवी ऊर्जा प्रगट होऊन कार्यरत होते आणि ती त्यांच्या पंचज्ञानेंद्रियांतून वातावरणात प्रक्षेपित होते. प्रगट शक्ती उष्ण स्वरूपाची असल्यामुळे त्यांनी नाक आणि तोंड यांतून उच्छ्वासावाटे बाहेर सोडलेली हवा गरम असल्याचे जाणवते. कानाजवळ हात धरला, तरी हाताला उष्णता जाणवते.
१ इ. श्रीविष्णूची मारक शक्ती त्यांची दृष्टी आणि उच्छ्वास यांच्या माध्यमातून वातावरणात प्रक्षेपित झाल्याने त्यांचे नाक अन् तोंड यांतून उच्छ्वासावाटे बाहेर सोडलेली हवा गरम असल्याचे जाणवणे : परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे पाताळातील मोठ्या वाईट शक्तींशी घनघोर सूक्ष्म युद्ध चालू आहे. हे युद्ध करत असतांना त्यांच्या देहातून पंचतत्त्वे सगुण स्तरावर आणि त्यांच्या सूक्ष्म अस्तित्वाच्या माध्यमातून निर्गुण स्तरावर वाईट शक्तींशी लढतात. या युद्धाच्या अंतर्गत त्यांच्या देहातील श्रीविष्णूची मारक शक्ती त्यांची दृष्टी आणि उच्छ्वास यांच्या माध्यमातून वातावरणात प्रक्षेपित होत आहे. श्रीविष्णूची मारक शक्ती उष्ण स्वरूपाची असल्यामुळे त्यांच्या नाक आणि तोंड यांतून उच्छ्वासावाटे बाहेर सोडलेली हवा गरम असल्याचे जाणवते.
२. उच्छ्वासावाटे गरम हवा जाणवण्यामागील तीन कारणे
सूक्ष्म युद्ध चालू असणे, सूर्यनाडी चालू असणे आणि श्रीविष्णूची मारक शक्ती प्रक्षेपित होणे, ही उच्छ्वासावाटे गरम हवा जाणवण्यामागील तीन प्रमुख कारणे आहेत. या तिन्ही कारणांतील भेद येथे दिला आहे.
२ अ. सूक्ष्म युद्ध चालू असणे, सूर्यनाडी चालू असणे आणि श्रीविष्णूची मारक शक्ती प्रक्षेपित होणे
३. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना नाकावाटे दीर्घ उच्छ्वास सोडल्यास नाकाखालील त्वचेला नकोशी वाटणारी गरमी जाणवण्यामागील कारण
परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या उच्छ्वासावाटे प्रक्षेपित झालेली मारक शक्ती पुष्कळ असल्यामुळे ती त्वचेला सहन होत नाही. त्यामुळे नाकावाटे दीर्घ उच्छ्वास सोडल्यास नाकाखालील त्वचेला नकोशी वाटणारी गरमी जाणवते.
४. श्वासातून गरम हवा जाण्याचे प्रमाण उणावण्यासाठी करावयाचे उपाय
अ. डाव्या नाकपुडीने श्वास सोडल्यास चंद्रनाडी कार्यरत होऊन देहात शीतलता पसरते आणि उच्छ्वासावाटे शीतल हवा प्रक्षेपित होते.
आ. सूक्ष्म युद्धाची तीव्रता उणावल्यावर मारक शक्ती, प्रगट शक्ती आणि सूक्ष्म युद्ध यांचे प्रमाण न्यून होऊन देहात आपोआप तारक शक्ती कार्यरत होऊन देहातून शीतल लहरींचे प्रक्षेपण होईल.’
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२३.१०.२०१९)
|