काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना साहाय्य करणारा पोलीस उपअधीक्षक आणि मुख्याध्यापक नोकरीतून बडतर्फ !
या वर्षी आतापर्यंत २९ सरकारी कर्मचारी नोकरीतून बडतर्फ
अशांना केवळ नोकरीवरून काढून सोडू देऊ नये, तर त्यांना कारागृहात टाकून कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! – संपादक
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य केल्याच्या प्रकरणी प्रशासनाने कारागृह उपअधीक्षक फिरोज अहमद लोन आणि मुख्याध्यापक जावेद अहमद शाह या दोघांना नोकरीतून बडतर्फ केले आहे. आतंकवाद्यांना साहाय्य केल्याच्या प्रकरणी या वर्षी आतापर्यंत एकूण २९ सरकारी कर्मचार्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.
१. फिरोज अहमद कारागृहामध्ये अटकेत असलेल्या आतंकवाद्यांच्या त्याच्या सहकार्यांसमवेत बैठका आयोजित करत होता. तो हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेचा सक्रीय सदस्य होता. त्याने अनेक काश्मिरी युवकांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवण्यास साहाय्य केले होते.
२. जावेद शाह ‘जमाते इस्लामी’ आणि हुर्रियत कॉन्फरन्स या फुटीरतावादी संघटनांचा कट्टर समर्थक आहे. वर्ष २०१६ मध्ये आतंकवादी बुरहान वानी याला सुरक्षादलांनी ठार केल्यावर झालेल्या हिंसाचारामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती. तो शाळेतील विद्यार्थ्यांना जिहादी धडे देत होता. त्याने शाळेमध्ये शारीरिक शिक्षणावर बंदी घातली होती; कारण ‘ते इस्लामच्या विरोधात आहे’, असे त्याचे म्हणणे होते. (इतकी सर्व माहिती प्रशासनाला होती, तर त्याच्यावर आधीच कारवाई करून त्याला कारागृहात का डांबले नाही ? – संपादक)