आमचा हिंदु धर्म श्रेष्ठ का आहे, हे दर्शवणारी काही उदाहरणे
१. ‘भारताच्या उत्थानाचे कार्य जेवढे हिंदु धर्मात होते, तेवढे कोणत्याही अन्य धर्मात होत नाही.
२. धर्मरक्षणासाठी प्राणांची आहुती देणारी जेवढी उदाहरणे हिंदु धर्मात पहायला मिळतात, तेवढी अन्य कोणत्याही धर्मात आढळत नाही, उदा. पृथ्वीराज चौहान, छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह, राणी लक्ष्मीबाई इत्यादी.
३. भाऊ-बहीण मग ते कोणत्याही नात्याने असो, ते भाऊ-बहीणच रहातात.
४. हिंदु समाजातील व्यक्ती दयाळू असतात. ते पशूंनाही दया दाखवण्याला महत्त्व देतात.
५. जेवढे महापुरुष हिंदु समाजात झाले, जेवढे तपस्वी, ऋषि, महर्षि होऊन गेले, ते सर्व आध्यात्मिकतेने जोडलेले आहेत. त्यांनी आपल्या अनुभवाचे ज्ञान सर्वांना दिले.
६. हिंदु धर्म राष्ट्राप्रती कर्तव्यांचा बोध देतो.
७. अशी अनेक उदाहरणे आहेत. वास्तवात हिंदु धर्म श्रेष्ठ धर्म आहे. आम्हाला गर्व वाटायला हवा की, आपण हिंदु आहोत. आपला जन्म हिंदु परिवारामध्ये झाला आहे.’
– रश्मि अग्रवाल
संदर्भ : (साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, ४ एप्रिल ते १० एप्रिल २०१८)