गावो विश्वस्य मातरः ।
‘चराचर जगाची माता अर्थात् विश्वाचा आधार गोमाता आहे. वेद, पद्म, पुराण, भविष्य पुराण, स्कंद पुराण, महाभारत, विष्णुधर्मोत्तर पुराण, बृहत्पराशर स्मृती आदी ग्रंथांमध्ये गायीच्या शरिरात अनेक देवदेवतांच्या निवासाचे वर्णन करण्यात आले आहे; म्हणून गायीला ‘विश्वरूपा’ म्हटले आहे.
लक्ष्मीश्च गोमये नित्यं पवित्रा सर्वमङ्गला ।
गोमयालेपनं तस्मात्कर्तव्यं पाण्डुनन्दन ॥
– स्कन्दपुराण, अवन्तीखण्ड, अध्याय ८३, श्लोक १०९
अर्थ : (मार्कण्डेय ऋषि म्हणतात) ‘‘हे युधिष्ठिरा, गायीच्या शेणात परम पवित्र, सर्वमंगलमयी लक्ष्मीदेवी नित्य निवास करते. म्हणून शेणाने लेपन केले (सारवले) पाहिजे.’’
(संदर्भ : मासिक ‘लोक कल्याण सेतू’, सप्टेंबर २०१९)