फटाक्यांवर बंदी घालण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात पुन्हा याचिका प्रविष्ट करणार ! – चित्रपट निर्मात्या रोशनी अली
रोशनी अली यांच्याच याचिकेवर कोलकाता उच्च न्यायालयाने घातली होती फटाके फोडण्यावर बंदी !
|
कोलकाता (बंगाल) – चित्रपट निर्मात्या रोशनी अली यांनी दिवाळी आणि श्री महाकाली देवीच्या पूजेच्या वेळी फटाके फोडण्यावर राज्यात बंदी घालण्यात यावी, यासाठी पुन्हा कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार असल्याचे सांगितले आहे. यापूर्वी त्यांनी केलेल्या याचिकेवर निकाल देतांना कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमध्ये फटाके फोडण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर या निकालाला फटाके उत्पादकांकडून आव्हान देण्यात आल्यावर सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी रहित केली होती.
पटाखों पर पूर्ण प्रतिबंध को खारिज करने के SC के फैसले से नाराज रोशनी अली, कहा- कलकत्ता HC में फिर से करूँगी अपील#CalcuttaHighCourt #RoshniAlihttps://t.co/t2PWwLTH7V
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 2, 2021
सर्वोच्च न्यायालयाने बंदी रहित केल्यानंतर रोशनी अली यांनी म्हटले की, माझी लढाई अद्याप संपलेली नाही. मी आताही माझ्या श्वास घेण्याच्या अधिकारासाठी लढणार आहे. हे केवळ पर्यावरणासाठी नाही, तर आपल्या व्यक्तीगत आरोग्यासाठी आहे. (याचप्रमाणे रोशन अली मशिदींवरील भोंग्यांवर देण्यात येणार्या अजानामुळे ध्वनीप्रदूषण होत असल्याचे सांगून भोंग्यांवरून अजान देण्यास बंदी घालण्याची याचिका प्रविष्ट करतील का ? – संपादक)