‘दिवाळी पहाट’सारख्या गीतगायनाच्या कार्यक्रमांपेक्षा दीपावलीच्या पहाटे धर्मशास्त्रानुसार कृती करा !
‘दिवाळी पहाट’सारख्या गीतगायनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यापेक्षा परंपरागत धर्मशास्त्रानुसार दीपावली साजरी करून धर्माचरण करणे अपेक्षित आहे. शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी किंवा अशा कार्यक्रमांसाठी संपूर्ण दिवस किंवा अन्य दिवसही असतात.
दीपावलीचा सण ज्या विशिष्ट तिथींना येतो, त्यांना विशिष्ट असा अर्थ आहे. त्यामुळे धर्मशास्त्रात दिवाळीच्या पहाटे अभ्यंगस्नानासह उटणे लावणे, पणत्या लावणे, देवळात जाणे आणि त्या त्या सणानुसार अन्य धार्मिक कृती करायला सांगितल्या आहेत. दिवाळीच्या पहाटे त्या भावपूर्ण करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला चैतन्य मिळून आध्यात्मिक लाभ होतो. त्यामुळे आपण काही अंशी ईश्वराच्या जवळ जातो.
(संदर्भ – दैनिक ‘सनातन प्रभात’)