तेल-वातीच्या पणत्यांचे स्थान आजही अढळ !
दिवाळी वा इतर धार्मिक सण आणि समारंभात निरांजन अन् समई यांच्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाऊबीज वा अन्य प्रसंगी निरांजनाने ओवाळणे, ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. देवपूजेत निरांजनही असतेच. हल्ली कितीही अत्याधुनिक दिव्यांचा वापर होत असला, तरीही मातीच्या तेल-वातीच्या पणत्या त्यांचे अढळ स्थान आजही टिकवून आहेत. जेव्हा वीज गेल्यावर विजेचे दिवे निरुपयोगी होत, तेव्हा घरोघरी चिमण्या, कंदिल, मेणबत्त्या हीच साधने प्रामुख्याने वापरली जात. राखीव प्रकाशसाधन म्हणून ती घरोघरी ठेवलेली असतातच.