कृत्रिम रोषणाईचे सूक्ष्मातून होणारे अनिष्ट परिणाम लक्षात घ्या !
दिवाळीच्या दिवशी कृत्रिम, लुकलुकणार्या आणि विचित्र आकाराच्या रोषणाईमुळे प्रकाशाच्या स्वरूपात तम ऊर्जात्मक शक्तीचे प्रक्षेपण होणे
हल्ली पेठेत (बाजारात) कृत्रिम लुकलुकणार्या इलेक्ट्रिक दिव्यांच्या माळा मिळतात. काही दिवे शांत असतात, तर काही दिवे अधिक प्रमाणात उघड-झाप करतात. काहींचे रंगही पुष्कळ गडद आणि डोळ्यांना त्रासदायक असतात. ‘कृत्रिम रोषणाईचे सूक्ष्मातून काय परिणाम होतात’, हे लक्षात घेऊया आणि ती करणे टाळूया !
१. कृत्रिम रोषणाई केल्यामुळे होणारे परिणाम
‘दिवाळीच्या दिवशी केल्या जाणार्या कृत्रिम रोषणाईमुळे वातावरणात प्रवाहित होणार्या ईश्वराच्या तारक लहरी कृत्रिम रोषणाईतून प्रक्षेपित होणार्या तेजोमय तमात्मक ऊर्जेमुळे गतीच्या अभावी संचारणात्मक अवस्थेतून स्थिर स्वरूपात बद्ध होतात. वातावरणात असणार्या कनिष्ठ वाईट शक्ती वायूमंडलात गतीमान होऊन पूर्ण वातावरणातील नैसर्गिक क्षमता शोषली जाते. वातावरण रज-तमाने भारीत आणि स्मशानाप्रमाणे त्रासदायक बनते.
२. लुकलुकणारी रोषणाई केल्यामुळे होणारे परिणाम
लुकलुकणार्या रोषणाईच्या आकर्षण क्षमतेमुळे प्रक्षेपित होणार्या रजोगुण आच्छादनासह वाईट शक्ती त्या प्रकाशाचा उपयोग करून रोषणाई बघणार्या जिवांवर त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण करतात. त्यामुळे जिवाभोवती ५-७ फूट एवढ्या मोठ्या आवरणाची निर्मिती करणे त्यांना सहजरित्या शक्य होते.
३. विचित्र आकारात रोषणाई केल्यामुळे होणारे परिणाम
एका रेषेत रोषणाई न केल्यामुळे रोषणाईच्या विचित्र आकारांच्या माध्यमातून मोठ्या वाईट शक्तीला विविध प्रकारचे त्रासदायक शक्तीचे समूह एकाच वेळेस पूर्ण वायूमंडलात प्रक्षेपित करता येतात.’
– श्री. निषाद देशमुख, रामनाथी, गोवा. (८.१०.२००६)
दिवाळीच्या दिवशी जुगार खेळल्याचे सूक्ष्मातील दुष्परिणाम !दिवाळीच्या दिवशी जुगार खेळल्याने समाजावर प्रक्षेपित होणार्या श्री लक्ष्मीतत्त्वाला प्रतिबंध होणे आणि मोठ्या वाईट शक्ती त्या माध्यमातून पूर्ण समाजावर अलक्ष्मीचा वर्षाव करू शकणेदिवाळीच्या दिवशी केल्या जाणार्या समष्टीच्या इच्छाशक्तीच्या निर्गुण बलावर सगुण पूजेमुळे कार्यरत होणार्या सूक्ष्म क्रियाक्षेत्रामुळे धनाची देवी श्री महालक्ष्मी आकृष्ट होऊन साधना करणार्या जिवांच्या सूक्ष्मदेहावर ईश्वरप्राप्ती करून देणार्या धनाचा, म्हणजेच गुणांचा संस्कार करते. समष्टी स्तरावर जुगार खेळल्यामुळे पूजा केल्यावर निर्माण होणार्या सूक्ष्म क्रियाक्षेत्राचे धनत्व आकुंचनात्मक स्वरूपात होऊन समाजावर प्रक्षेपित होणार्या लक्ष्मीतत्त्वाला अडवते. जुगारासारखा तमवर्धक खेळ दिवाळीला खेळल्यामुळे मोठ्या वाईट शक्ती तेथे येऊन आपल्या मायाजाळात जिवांना अडकवून त्यांच्यावर आणि त्यांच्या माध्यमातून समाजावर अलक्ष्मीचा वर्षाव करून समाजातील समृद्धीला नष्ट करतात. स्थूल स्तरावर खेळल्या जाणार्या या खेळाचे सूक्ष्म स्तरावर महाभयंकर परिणाम होतात.’ – श्री. निषाद देशमुख, रामनाथी, गोवा (८.१०.२००६) |
|