काँग्रेसच्या घटनेत पालट करण्यात येणार
|
|
नवी देहली – १०० वर्षांपूर्वी मोहनदास गांधी यांच्या पक्षाच्या अध्यक्षतेखाली पक्षाची घटना लिहिण्यात आली होती. आता त्यात पालट करण्यात येणार आहे. यात ‘मद्यपान न करणे’ आणि ‘खादी विणण्याची अनिवार्यता’, या नियमांत सवलत दिली जाऊ शकते. त्याच वेळी सार्वजनिक व्यासपिठावर विधाने करू नयेत, यासाठीचे नियम कडक केले जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. घटनेत पालट करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
Congress leader #RahulGandhi said it makes no sense in present times to have the abstention clause and then asked for a show of hands of people in the room who drink.@richa_TNIE https://t.co/kaQRNf3B6x
— The New Indian Express (@NewIndianXpress) October 27, 2021
ऑक्टोबर मासात काँग्रेसच्या पदाधिकार्यांच्या एका बैठकीत घटनेतील सूत्रांवर ‘मनमोकळी’ चर्चा झाली. ‘मद्यपानापासून दूर रहावे’ या गोष्टींचे पालन करू शकलो नाही, असे बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकार्यांपैकी ६० टक्के पदाधिकार्यांनी मान्य केले.