त्रिशूर (केरळ) येथे भाजपच्या एका कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि तिची राजकीय संघटना एस्.डी.पी.आय.वर संशय
|
त्रिशूर (केरळ) – येथे भाजपचे ३५ वर्षीय कार्यकर्ते कोप्पारा बीजू यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. बीजू २ मासांपूर्वी आखाती देशांतून नोकरी करून परतले होते. सध्या ते येथील मनाथला नागायक्षी मंदिराजवळ पाळीव कबुतरे विकण्याचा व्यवसाय करत होते.
BJP worker killed in Chavakkad. #Kerala @BJP4India https://t.co/1H4c3krjul via @NewIndianXpress
— TNIE Kerala (@xpresskerala) November 1, 2021
३१ ऑक्टोबर या दिवशी बीजू यांच्या दुकानाजवळ सजीवन नावाच्या तरुणाचा काही लोकांशी वाद झाला होता. या वादातूनच बीजू यांना सजीवन समजून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बीजू यांच्या हत्येनंतर भाजपने येथे ‘बंद’चे आवाहन केले होते. ‘या हत्येमागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि तिची राजकीय संघटना एस्.डी.पी.आय. (सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया) यांचे कार्यकर्ते आहेत’, असा आरोप भाजपने केला आहे. या हत्येद्वारे येथे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेल्याचाही दावा करण्यात आला.