श्रीनगरमधून उड्डाण करणार्या विमानांना पाककडून त्याच्या आकाश क्षेत्राचा वापर करू देण्यास नकार !
आता भारतानेही पाकच्या विमानांना भारतीय आकाश क्षेत्राचा वापर करू देण्यास नकार देऊन रोखठोक प्रत्युत्तर दिले पाहिजे !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकने जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर ते शारजाहपर्यंतच्या विमानांसाठी त्याच्या आकाश क्षेत्राचा वापर करू देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता श्रीनगरहून उड्डाण करणारी विमाने आता उदयपूर, कर्णावती, ओमानमार्गे शारजाहला जातील.
Pakistan has refused to allow Go First’s Srinagar-Sharjah flight to fly in its airspace.https://t.co/5XhrhLAL03
— Hindustan Times (@htTweets) November 3, 2021
यामुळे श्रीनगर ते शारजाहपर्यंतचा विमान प्रवास एक घंट्यांपेक्षा अधिक वेळ लांबणार आहे. वेळ आणि प्रवास वाढल्यास प्रवासाचा खर्च वाढून तिकीट महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.