मुसलमान असूनही केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यामुळे धर्मांधांकडून अभिनेत्री सारा अली खान यांच्यावर टीका
सर्वधर्म समभाव आणि धर्मनिरपेक्षता ही केवळ हिंदूंनी जोपासायची असते, तर अन्य लोकांनी त्यांच्या धर्माचे कट्टरतेने पालन करायचे असते, हेच गेल्या ७४ वर्षांत भारतात घडत आहे, हे हिंदूंच्या अद्याप लक्षात येत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !
मुंबई – अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी उत्तराखंडमधील केदारनाथ येथील मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर काही धर्मांधांकडून सामाजिक माध्यमांद्वारे सारा अली खान यांना ‘ट्रोल’ (सामाजिक माध्यमांद्वारे विरोध करणे किंवा टीका करणे) केले जात आहे.
Sara Ali Khan and Janhvi Kapoor offer prayers at Kedarnath Temple, fan says ‘Wow, this is sanskar’. See picshttps://t.co/lgV7E951Qf
— HT Entertainment (@htshowbiz) November 1, 2021
सारा यांनी केदारनाथ मंदिराजवळ काढलेली स्वतःची काही छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली होती. त्यानंतर तिला ‘ट्रोल’ करण्यात आले. एकाने टीका करतांना, ‘तुला लाज वाटली पाहिजे. तू एक मुसलमान असून हिंदूंच्या देवाचे दर्शन घेते’, असे म्हटले आहे.