सुदिन ढवळीकर यांची भेट घेणार’, या गडकरी यांच्या विधानामुळे भाजप-मगोप युतीची शक्यता
पणजी, २ नोव्हेंबर (वार्ता.) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘श्री. सुदिन ढवळीकर यांची भेट घेणार’ या विधानामुळे भाजप-मगोप युती होण्याची शक्यता निर्माण झाली. याविषयी गडकरी म्हणाले, ‘‘कदाचित् मगोप भाजपशी युती करणार नसेल; परंतु माझे श्री. सुदिन ढवळीकर यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांची भेट घेणार आहे.’’ गडकरी यांच्या या विधानाविषयी प्रतिक्रिया देतांना पूर्वीचे मगो पक्षाचे आमदार सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर म्हणाले, ‘‘मी भाजप-मगोप युतीच्या बाजूने नाही; कारण त्यामुळे भाजपला फार काही लाभ होणार नाही. मगोपचे संघटन मोठे नाही. संघटनेत अवघेच काही सदस्य आहेत.’’