अमरावती येथे मुलींची छेड काढणार्या धर्मांधाला नागरिकांकडून चोप !
असे जागरूक हिंदु नागरिक सर्वत्र हवेत ! – संपादक
अमरावती, २ नोव्हेंबर (वार्ता.) – शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येणार्या रविनगर परीसरातील महंमद सईद महंमद इसराईल (वय ३२ वर्षे) या धर्मांध व्यक्तीने रस्त्यावरून येणार्या अल्पवयीन मुलीची छेड काढली. त्या वेळी मुलीने आजुबाजूला असलेल्या लोकांचे साहाय्य मागितले. नागरिकांनी तत्परतेने त्या धर्मांधाला पकडून चोप दिला. या घटनेची माहिती पोलिसांना जमावातील काही नागरिकांनी दिली असता पोलिसांनी आरोपीला अटक केली. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीद्वारे पोलिसांनी आरोपीवर विविध कलमांद्वारे गुन्हा नोंदवला आहे.