धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हिंदु जनजागृती समितीचे निवेदन
सांगली, २ नोव्हेंबर (वार्ता.) – धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १ नोव्हेंबर या दिवशी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत प्रशासनाला देण्यात आले.
जिल्हा सांगली
१. मिरज येथे प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार नारायण मोरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी भाजपचे सांस्कृतिक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष श्री. ओंकार शुक्ल, बजरंग दलाचे संयोजक श्री. आकाश जाधव, श्री. सागर तामगावे, ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. विठ्ठल मुगळखोड, श्री. प्रकाश कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद कुलकर्णी आणि श्री. गिरीष पुजारी उपस्थित होते.
२. कवठेमहांकाळ येथे प्रभारी नायब तहसीलदार एस्.एस्. गोरे यांनी निवेदन स्वीकारले.
जिल्हा कोल्हापूर
१. कागल येथे निवासी नायब तहसीलदार श्रीमती रूपाली सूर्यवंशी-बरगे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना उपशहरप्रमुख श्री. प्रभाकर थोरात, शिवसेनेचे श्री. म्हाळू करीकट्टी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. किरण चव्हाण आणि श्री. दशरथ डोंगळे, हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण कुलकर्णी आणि श्री. सुधाकर चव्हाण, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर उपस्थित होते.
२. हुपरी येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे हुपरी शहराध्यक्ष श्री. नितीन काकडे, युवा सेनेचे श्री. विक्रम सावंत, हिंदुत्वनिष्ठ रवींद्र गायकवाड, धर्मप्रेमी श्री. प्रवीण घोरपडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे, श्री. संतोष सणगर आणि सौ. विजया वेसणेकर उपस्थित होत्या.
प्रदूषणकारी, तसेच देवतांची विटंबना करणार्या फटाक्यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हुपरी पोलीस ठाण्यात निवेदन
कोल्हापूर, २ नोव्हेंबर (वार्ता.) – प्रदूषणकारी आणि देवतांची विटंबना करणार्या फटाक्यांवर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १ नोव्हेंबर या दिवशी हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांना देण्यात आले. याच मागणीचे निवेदन शिरोळ येथे नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना आणि शिरोळ पोलीस ठाण्यात हवालदार डी.डी. सानप यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.