काश्मिरी मुसलमानांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यावरून काश्मीरमध्ये भाजपच्या नेत्यावर गुन्हा नोंद
श्रीनगर – काश्मिरी मुसलमानांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी भाजपचे नेते आणि माजी आमदार विक्रम रंधावा यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी अधिवक्ता मुझफ्फर अली शाह यांच्या लेखी तक्रार प्रविष्ट केली होती.
बीजेपी नेता पर FIR हुई दर्ज #Crime #T20WorldCup @kamaljitsandhuhttps://t.co/O6hRTkcuJI
— AajTak (@aajtak) November 2, 2021
टी-२० विश्वचषक क्रिकेट सामन्यात पाकिस्तानच्या संघाने भारतावर विजय मिळवल्यानंतर काश्मीरच्या अनेक भागांमध्ये पाकचा विजय साजरा करण्यात आला होता. (भारतात राहून शत्रूराष्ट्राचा विजय साजरा करणारे देशद्रोही नव्हेत का ? सरकारने त्यांच्यावर काय कारवाई केली आहे ?, हे जनतेला कळले पाहिजे ! – संपादक) त्यावर रंधावा यांनी टीका केली होती. याविषयी जम्मू-काश्मीर भाजपनेही रंधावा यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. ‘रंधावा यांनी जी भाषा वापरली, ती सहन केली जाऊ शकत नाही’, असे भाजपचे रविंदर रैना यांनी सांगितले.