नरकासुराच्या प्रतिमा बनवणार्यांना लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य !
निवडणुकीच्या धामधुमीत यंदा पणजी येथे नरकासुराच्या प्रतिमांमध्ये वाढ
|
पणजी – गतवर्षी कोरोना महामारीमुळे काही प्रमाणात निर्बंध असल्याने नरकासुराच्या प्रतिमा अल्प प्रमाणात करण्यात आल्या होत्या; मात्र यंदा कोरोना महामारीचा कहर काहीशा प्रमाणात उणावल्याने आणि विधानसभा निवडणुकीची धामधूम असल्याने यंदा पणजी मतदारसंघात नरकासुर प्रतिमांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. तसेच प्रतिमांमध्ये वाढ होण्यासमवेतच प्रतिमांची उंची वाढवलेली दिसत आहे. ५ ते ३० फुटांपर्यंत अक्राळविक्राळ नरकासुराच्या प्रतिमा बनवण्यात येत आहेत. प्रतिमा सिद्ध करणार्यांना लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक साहाय्य मिळत आहे.