(म्हणे) ‘महंमद अली जीना हे स्वातंत्र्यलढ्याचे नायक होते !’ – अखिलेश यादव, अध्यक्ष, समाजवादी पक्ष
मुसलमानांच्या मतांसाठी देशाच्या फाळणीला आणि त्यानंतर झालेल्या १० लाख हिंदूंच्या हत्याकांडाला उत्तरदायी असलेल्या जिनांचा असा उदोउदो करणार्या अखिलेश यादव यांना सरकारने कारागृहात टाकून त्यांच्या पक्षावर बंदी घातली पाहिजे ! – संपादक
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – सरदार पटेल, म. गांधी, नेहरू आणि महंमद अली जीना यांनी एकाच विद्यापिठातून शिक्षण घेतले. ते बॅरिस्टर झाले आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. ते स्वातंत्र्यलढ्याचे नायक होते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी रा.स्व. संघावर बंदी घातली, असे विधान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एका जाहीर सभेत केले. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
SP chief #AkhileshYadav stirs controversy by glorifying Muhammad Ali Jinnah at a party rally in Hardoi. #UttarPradesh #UttarPradeshElections2022 #Election2022https://t.co/65Q0pKznY4
— Zee News English (@ZeeNewsEnglish) November 1, 2021
अखिलेश यादव यांनी जनतेची क्षमा मागावी ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
सरदार वल्लभभाई पटेल यांची जिनांशी तुलना करणे, ही तालिबानी मानसिकता आहे.
#BREAKING | Uttar Pradesh CM Yogi Adityanath slams Samajwadi Party chief Akhilesh Yadav for hailing Muhammad Ali Jinnah.अखिलेश
Watch #LIVE here: https://t.co/aPPzyhl1dj pic.twitter.com/euI6s6uTqK
— Republic (@republic) November 1, 2021
समाजवादी पक्षाच्या या विभाजनवादी मानसिकतेला जनता कदापि थारा देणार नाही. अखिलेश यादव यांनी देशातील जनतेची क्षमा मागितली पाहिजे.