प्रेमभाव आणि सेवेची तळमळ असणार्या सोलापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुनंदा म्हेत्रे (वय ६३ वर्षे) !
पू. (कु.) दीपाली मतकर, सोलापूर
१. प्रेमभाव
‘सौ. म्हेत्रेकाकू सर्वांशी पुष्कळ प्रेमाने आणि नम्रतेने बोलतात. त्या सतत साधकांमधील गुण पहातात.
२. सेवेची तळमळ
अ. मध्यंतरी त्यांना पुष्कळ शारीरिक त्रास होत होता, तरीही त्या तळमळीने सेवा करत होत्या.
आ. ‘प्रतिदिन जिज्ञासूंना भ्रमणभाष करून त्यांना साधना सांगणे, त्यांच्या अडचणी जाणून त्यांना साधनेत साहाय्य करणे’, असे प्रयत्न त्या तळमळीने करतात.
इ. काकू चालत जाऊन प्रसार करतात, तरी त्या थकलेल्या दिसत नाहीत. सतत सेवारत रहाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
ई. त्यांना सेवाकेंद्रातील साधकांसाठी खाऊ बनवायला सांगितल्यावर त्या ही सेवा भावपूर्ण करतात आणि सेवाकेंद्रात खाऊ पोचवण्याचे नियोजनही करतात.
३. भाव
अ. काकूंचा आवाज पुष्कळ मधुर आहे. त्यांचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते.
आ. काकू नामसत्संगात भावजागृतीचा प्रयोग भावपूर्ण सांगतात. काकू भावजागृतीचा प्रयोग सांगत असतांना नामसत्संगातील जिज्ञासूंचा भाव जागृत होतो. त्या वेळी काकूंना पुष्कळ कृतज्ञता वाटते.
इ. काकू त्यांच्याकडून झालेले साधनेचे प्रयत्न भावपूर्णरित्या सांगतात.’ (२५.१०.२०२१)
श्रीमती रूपावती न्यामणे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सोलापूर
१. सेवेची तळमळ
अ. ‘काकूंकडे दिवाळीच्या निमित्ताने आकाशकंदील बनवण्याची सेवा होती. त्यांनी ही सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण केली.
आ. काकूंचे शिक्षण इयत्ता चौथीपर्यंतच झाले आहे. पूर्वी त्यांना समाजातील व्यक्तींना साधना सांगायला अडचण वाटायची; पण गुरुसेवेची तीव्र तळमळ असल्यामुळे त्या या अडचणीवर मात करून प्रसार करतात.
इ. त्या गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) प्रार्थना करून समाजातील व्यक्तींना ग्रंथांची माहिती भावपूर्णरित्या सांगतात. त्या सनातनच्या ग्रंथांचे वितरण चांगल्या प्रकारे करतात.
ई. पूर्वी काकूंचे यजमान सेवा करत नव्हते; पण काकूंच्या तळमळीने आता तेही सेवा करत आहेत.
२. भाव
‘माझी काही क्षमता नसूनही गुरुदेवच माझ्याकडून सर्व करवून घेत आहेत’, असा काकूंचा भाव असतो.’ (२५.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |