सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधिका सौ. ज्योती कांबळे यांना सवत्स गोपूजनाच्या वेळी आलेल्या अनुभूती
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २०.६.२०१९ या दिवशी झालेल्या सवत्स गोपूजनाच्या वेळी सनातनच्या साधिका सौ. ज्योती कांबळे यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. गोपूजनाच्या वेळी त्रास होत असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि गोमाता यांच्याकडे बघितल्यावर धडधड न्यून होऊन शांत वाटू लागणे
‘२०.६.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात सवत्स गोपूजन विधी झाला. त्या वेळी विधी बघण्यासाठी बसल्यावर माझ्या छातीत धडधड होऊ लागली. नामजप जाणीवपूर्वक केला, तरी होत नव्हता. गोपूजन चालू असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि गोमाता यांच्याकडे बघितल्यावर धडधड न्यून होऊन शांत वाटू लागले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई गोपूजनाचे उपचार करत असतांना गोमाता शांत उभी होती. त्या वेळी ‘देवी करत असलेल्या पूजेचा ती स्वीकार करत आहे’, असे जाणवून मला आनंद वाटत होता.
२. श्रीसत्शक्ति बिंदाताईंनी गोमातेला चारा दिल्यावर श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवून ‘गोमातेच्या माध्यमातून श्रीसत्शक्ति बिंदाताईंना तेहतीस कोटी देवदेवतांचा आशीर्वाद मिळत आहे’, असे जाणवणे
श्रीसत्शक्ति बिंदाताईंनी गोमातेला प्रसाद म्हणून चारा दिला. तेव्हा श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवून ‘गोमातेच्या माध्यमातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंना तेहतीस कोटी देवदेवतांचा आशीर्वाद मिळत आहे’, असे जाणवले. त्या वेळी ‘सनातनच्या सर्व साधकांचे पूर्वजांचे त्रास नष्ट होऊन साधकांच्या पूर्वजांना गती मिळण्यासाठी ही पूजा होत आहे’, असे मला जाणवले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई वासराच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. तेव्हा ‘सर्व प्राणीमात्र आणि निसर्ग यांवर देवीची कृपा होत आहे’, असे जाणवून पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई या महालक्ष्मीस्वरूप आहेत’, या भावाने ‘वासरू आणि गोमाता त्यांच्या चरणांकडे पहात आहेत’, असे वाटले. त्या वेळी देवीच्या हातून गोमातेची पूजा होणे, म्हणजे ‘गोरक्षण होण्यासाठी ही शक्ती कार्यरत झाली आहे’, असे वाटत होते.’
– सौ. ज्योती कांबळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.६.२०१९)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |