(म्हणे) ‘आमच्या जीवनात धार्मिक स्थळे आणि तीर्थस्थाने यांना मोठे महत्त्व असून परमेश्वराच्या आशीवार्दाने आणि दर्शनाने आम्हाला नवीन ऊर्जा मिळते !’
देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे गोवा भेटीवर येण्यापूर्वी विधान
देवतांचे विडंबन होते, धर्मांधांकडून मंदिरांवर आक्रमणे होतात, हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात होतात त्या वेळी गप्प बसणार्या केजरीवाल यांच्यासारख्या नेत्यांना निवडणूक आली की, परमेश्वर आठवतो का ? हिंदूंनी हे समजून रहावे ! – संपादक
पणजी – आम आदमी पक्षाचे नेते तथा देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल १ नोव्हेंबर या दिवशी गोवा भेटीवर येत आहेत. काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी हे गोवा दौरा आटोपून शनिवारी परतल्यानंतर आता मुख्यमंत्री केजरीवाल यांचे आगमन होत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी कोकणीतून ट्वीट करून ही माहिती दिली.
#ArvindKejriwal का चुनावी राज्यों में दौरा जारी, आज जाएंगे #Goa #DelhiCM #AAP #GoaPolitics https://t.co/KGSioYglpE
— Times Now Navbharat (@TNNavbharat) November 1, 2021
मुख्यमंत्री केजरीवाल म्हणतात, ‘‘गोमंतकीय बंधूभगिनी यांच्याकडे संवाद साधण्यासाठी मी गोव्यात येत आहे. आम्हा सर्वांच्या जीवनात धार्मिक स्थळे आणि तीर्थस्थाने यांना मोठे महत्त्व आहे. परमेश्वराच्या आशीवार्दाने आणि दर्शनाने आम्हाला नवीन ऊर्जा मिळते.’’