छत्रपती शिवाजी महाराज ‘सेक्युलरवादी’ (निधर्मी) नाही, तर ‘हिंदु धर्मरक्षक’ ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
स्वातंत्र्योत्तर काळात हिंदूंच्या पराक्रमाचा इतिहास शिकवला न जाता, पाठ्यपुस्तकांमधून परकीय आक्रमकांचे उदात्तीकरण केले गेले. आजही छत्रपती शिवाजी महाराज यांची ‘सेक्युलरवादी’ (निधर्मी) प्रतिमा निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. वैयक्तिक जीवनात छत्रपती शिवाजी महाराज धर्मपरायण होते, तसेच त्यांचा राजधर्मही सनातन हिंदु धर्माच्या मूल्यांवर आधारित होता. ते ‘सेक्युलरवादी’ नाही, तर हिंदु धर्मरक्षक होते.